मुंबई

पाच वर्षांच्या मुलाची बापाविरोधात साक्ष

पत्नीच्या हत्येप्रकरणी दातांच्या डॉक्टरला जन्मठेप सत्र न्यायालयाचा निकाल

नवशक्ती Web Desk

मुंबई : पाच वर्षाच्या मुलासमोर पत्नीची निघृण हत्या करणारा दातांचा डॉक्टर उमेश बोबळे या आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी पाच वर्षाच्या मुलाच्या साक्षीसह शेजारी आणि तपास अधिकाऱ्याची साक्ष ग्राह्य धरून बोबळे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
दादर परिसरात राहणाऱ्या डॉ. उमेश बोबळे आणि त्यांच्या पत्नीने सहा वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. त्यात पोटगीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यातूनच डिसेंबर २०१६ मध्ये उमेशने आपल्या पाच वर्षांच्या मुलासमोर पत्नी तनुजा हिच्यावर घरातील चाकूने ३४ वार केले. त्यात गंभीर दुखापत होऊन तनुजाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोबळे याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यावर सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील रामनाथ किधी यांनी उमेश हा तनुजाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, तनुजा गरोदर राहिली होती त्यावेळी त्याने डीएनए टेस्टसाठी आग्रह धरला होता, पोटातील बाळ आपलेच असल्याचे सिद्ध करून घेण्यासाठी उमेशने डीएनए टेस्टसाठी तनुजावर सक्ती केली होती, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पाच वर्षांच्या मुलासह अन्य दहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश बनकर यांनी आरोपी उमेश बोबळेला २० हजारा रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून