Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा 
मुंबई

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात रविवारी मुंबईत ठाकरे बंधू हे 'गर्जना मोर्चा' काढणार आहेत. मुंबईत रविवारी सकाळी १० वाजता विराट गर्जना मोर्चा मेट्रो सिनेमापासून निघेल.

Swapnil S

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात रविवारी मुंबईत ठाकरे बंधू हे 'गर्जना मोर्चा' काढणार आहेत. मुंबईत रविवारी सकाळी १० वाजता विराट गर्जना मोर्चा मेट्रो सिनेमापासून निघेल.

सकाळी दहा वाजता या मोर्चासाठी नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी जमा होण्यास सुरुवात होईल. हा मोर्चा मुंबई पालिकेसमोर येईल. या ठिकाणी मोर्थ्याचे सभेत रूपांतर होईल.

पोलिसांच्या विनंतीनंतर मार्गात बदल

दरम्यान, या मोर्चासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचे नियोजन होते. मात्र, मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने मार्ग बदलण्याची विनंती केल्यानंतर मेट्रो सिनेमा ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा नवा मार्ग निश्चित करण्यात आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत बदललेल्या मार्गाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक तसेच मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात हा मोर्चा काढण्यात येत असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विविध राजकीय पक्षांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेळेआधीच मान्सूनची माघार; मुंबईसह महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची घोषणा

'मविआ'त नाराजीनाट्य; काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी; नेत्यांमध्ये आज पुन्हा चर्चा

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात; नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश

तीन वर्षांतच खटल्यांचा निकाल; गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा; BNS ची पूर्ण अंमलबजावणी गरजेची