वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे आगमन लांबणीवर; पहिला मान नागपूरचा, नंतर ठाण्याचा 
मुंबई

वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे आगमन लांबणीवर; पहिला मान नागपूरचा, नंतर ठाण्याचा

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेंतर्गत १०० अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस समाविष्ट होणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात २५ बस दाखल होण्याचे नियोजन होते. मात्र, पडताळणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी आढळल्याने बस आगमन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेंतर्गत १०० अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस समाविष्ट होणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात २५ बस दाखल होण्याचे नियोजन होते. मात्र, पडताळणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी आढळल्याने बस आगमन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. पहिल्या टप्यातील बस आधी नागपूरला मिळणार असून, त्यानंतर ठाण्याला बस मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या ठाणेकर नागरिकांना रोजच्या प्रवासात बसअभावी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या नव्या इलेक्ट्रिक बसच्या प्रतीक्षेत ठाणेकर आहेत. ठाणे परिवहन सेवेने यापूर्वी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानांतर्गत १२३ पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या होत्या. या बस १२ आणि ९ मीटर लांबीच्या असून, १२ मीटर लांबीच्या बसमध्ये ४० प्रवाशांची आसन क्षमता आहे.

इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहेत. डिझेल बसच्या तुलनेत या बसचा ऑपरेटिंग खर्च कमी येतो. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपूर महानगरपालिकेला सर्वप्रथम बस मिळणार असून, त्यानंतर ठाणे महानगरपालिकेला येणार आहे.

अजून काही महिन्यांची प्रतीक्षा

या योजनेंतर्गत ठाणे परिवहन सेवेला मिळणाऱ्या १०० बसेसपैकी ६० बस ९ मीटर आणि ४० बस १२ मीटर लांबीच्या असतील. सर्व बसेस वातानुकूलित असतील आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असतील. एकंदरीत, ठाणेकरांना त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी अधिक सोयीस्कर, पर्यावरणपूरक आणि आरामदायक बससेवा मिळावी, यासाठी अजून काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नंदुरबार : देवगोई घाटात शालेय बस दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, ३० हून अधिक विद्यार्थी जखमी

बार्शीत धक्कादायक घटना; आईने घेतला गळफास, १४ महिन्याच्या चिमुकल्यालाही दिलं विष, बाळाची प्रकृती गंभीर

BMC त सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक; पूर्णकालिक तत्त्वावरील पदासाठी १२ अर्ज दाखल; १० व १२ नोव्हेंबर रोजी होणार मुलाखत

१ ते १९ डिसेंबर या संसदेचे कालावधीत हिवाळी अधिवेशन

एसटीच्या तिकीट महसुलात सरासरी दैनंदिन तूट; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी