मुंबई

'ते' कृत्य विनयभंगाचेच! ६६ वर्षांच्या आरोपीला कनिष्ठ न्यायालयाचा झटका

महिलेचा हात पकडणे, तिच्या गालाला स्पर्श करणे हादेखील विनयभंगाचा गुन्हा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत गिरगावच्या दंडाधिकारी न्यायालयाने ६६ वर्षांच्या आरोपीला चांगलाच झटका दिला.

Swapnil S

मुंबई : महिलेचा हात पकडणे, तिच्या गालाला स्पर्श करणे हादेखील विनयभंगाचा गुन्हा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत गिरगावच्या दंडाधिकारी न्यायालयाने ६६ वर्षांच्या आरोपीला चांगलाच झटका दिला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शक्ती देशमुख यांनी आरोपीला एक हजार रूपयाच्या दंडासह एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवली.

ताडदेव तुळशीवाडी येथील इमारतीत राहणारी तक्रारदार महिला २० डिसेंबर २०२३ रोजी आपल्या घरी जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेली होती. त्यावेळी ६६ वर्षांचा बच्चूभाई दाफडा लिफ्टमध्ये आला. त्याने पहिल्यांदा महिलेचा हात पकडला आणि तिच्या गालाला स्पर्श केला. त्याच्या या कृत्याला महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने तिचा हात सोडला नाही आणि मधेच सहाव्या मजल्यावर तो बाहेर गेला. महिलेने लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने बच्चूभाई दाफडा याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी दाफडाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

न्यायालयाचे निरीक्षण

खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शक्ती देशमुख यांच्या समोर झाली. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांची न्यायालयाने दखल घेतली. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यापेक्षा तक्रारदार महिलेच्या तोंडी पुराव्याला अधिक महत्त्व आहे. तांत्रिक बाबीवरून तक्रारदार महिलेचा पुरावा नाकारता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत आरोपीला विनयभंगाच्या आरोपाखाली दोषी ठरवत एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता