मुंबई

जे.जे रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

प्रतिनिधी

राज्यातील आरोग्य क्षेत्रातील कंत्राटीकरण नियुक्त्यांवर परिचारिकांनी केलला बेमुदत संप संपला असतानाच, आता चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनीही सकाळी ८ ते १० या वेळात आंदोलन केले. आंदोलनावेळी आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला.

कंत्राटीऐवजी कायमस्वरुपी चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांच्या नियुक्त्या करा, या मुख्य मागणीसाठी जे.जे रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोमवार पासून आंदोलन सुरू झाले. सकाळी ८ ते १० या वेळेत हे आंदोलन रुग्णालय परिसरात सुरू आहे. हे तीन दिवस केवळ ठराविक वेळेपूरता आणि केवळ जेजे रुग्णालयात हे आंदोलन करण्यात येत असले तरी मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास या आंदोलनाची झळ लवकरच राज्यभरात दिसून येईल, असा इशाराही यावेळी दिला गेला.

सध्या जेजे रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या १६० जागा रिक्त आहेत. आणि १३ एप्रिल रोजी सरकारी अध्यादेशातून राज्य शासनाच्या रुग्णालयातील जागेवर कंत्राटी पद्धतीने चतुर्थ श्रेणीतील नियुक्त्या केल्या जातील, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदे भरण्यासाठीही कंत्राटी पद्धतीचा अवबंल केला जाईल. कंत्राटीपद्धतीने नोकरीचे भवितव्य अंधारात येईल, असे चतुर्थश्रेणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे यांनी सांगितले. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या अधिपत्याखाली आणि चतुर्थश्रेणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव