मुंबई

भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबली

भारतीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला.

प्रतिनिधी

भारतीय शेअर बाजारात सलग सहा दिवसांची घसरण सोमवारी दोलायमान स्थितीनंतर थांबली असून सेन्सेक्स २३७ अंकांनी वधारला. युरोपियन बाजारातील सकारात्मक वातावरणाचा लाभ झाल्याचे दिसते. दरम्यान, भारतीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला. सोमवारच्या व्यवहारात रुपया ७ पैशांनी वधारुन ७७.९८ झाला.

बीएसई सेन्सेक्स २३७.४२ अंक किंवा ०.४६ टक्का वधारुन ५१,५९७.८४ वर बंद झाला. दिवसभरात तो ५१,७१४.६१ ही कमाल तर ५१,०६२.९३ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ५६.६५ अंक किंवा ०.३७ टक्का वाढून १५,३५०.१५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंटस‌् आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागात मोठी वाढ झाली. तर टाटा स्टील, इंडस‌्इंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, एनटीपीसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या समभागात घट झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.०६ टक्का वाढून प्रति बॅरलचा भाव ११३.२ अमेरिकन डॉलर्स झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी बाजारातून ७,८१८.६१ कोटींच्या समभागांची विक्री केली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत