मुंबई

घसरण थांबली; सेन्सेक्समध्ये ४७९ अंकांनी वाढ

वृत्तसंस्था

बँका, ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने गेल्या तीन दिवसांची घसरण थांबली. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास १ टक्के वाढ झाली. सेन्सेक्सने ४७९ अंकांनी उसळी घेतली.

शेअर बीएसई सेन्सेक्स ४७८.५९ अंक किंवा ०.८४ टक्का उसळी घेऊन ५७,६२५.९१ वर बंद झाला. दिवसभरात तो ५४०.३२ अंकांनी वधारून ५७,६८७.६४ वर गेला होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी पुन्हा १७,१०० वर गेला असून, १४०.०५ अंक किंवा ०.८२ टक्का वधारून १७,१२३.६० वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत पॉवरग्रीड, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, इंडस‌्इंड बँक, लार्सन ॲण्ड टुब्रो आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागात वाढ झाली. तर एशियन पेंटस‌्, डॉ. रेड्डीज, भारती एअरटेल, टायटन आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागात घसरण झाली. आशियाई बाजारता सेऊल, शांघायमध्ये वाढ तर टोकियोमध्ये घट झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.३९ टक्का वधारून ९४.६४ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल झाले. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारी ४,६१२.६७ कोटींच्या समभागांची विक्री केली.

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

Video : क्रिकेट खेळताना गुप्तांगाला लागला बॉल, पुण्यातील ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

'ही' परवडणारी कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! ग्राहकांना लावलंय वेड

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी दररोज खा 'ही' फळं