एकनाथ शिंदे  संग्रहित फोटो
मुंबई

अधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

Swapnil S

मुंबई : मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत टाऊन वेडिंग कमिटीची स्थापना करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना दिले आहेत. तसेच अधिकृत फेरीवाल्यांचा डेटा गोळा करत फेरीवाला झोन निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच अधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली निघेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नंदनवन बंगल्यावर पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे प्रवक्ते आणि माजी खासदार संजय निरूपम, आझाद हॉकर्स युनियनचे दयाशंकर सिंह, जयशंकर सिंह तसेच विविध फेरीवाला संघटनांचे पदाधिकारी आणि फेरीवाले उपस्थित होते.

मुंबईत ३२ हजारांहून अधिक अधिकृत फेरीवाले आहेत. अधिकृत फेरीवाल्यांची जागा निश्चित करण्यासाठी लवकरच फेरीवाला प्रतिनिधींची निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीनंतर अधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली निघेल, असे बोलले जात आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही, पण उपजीविकेचे साधन हिरावून घेतले जाणार नाही, असा सर्वमान्य तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला