मुंबई

ओलाकडून ५०० कर्मचाऱ्यांची कामावरून कपात

वृत्तसंस्था

‘ओला’ने त्यांच्या सॉफ्टवेअर वर्टिकलमध्ये किमान ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते. या विभागात अनेक कर्मचारी ओला अ‌ॅपवर काम करत होते. ओला इलेक्टि्रक स्कूटरच्या घसरत्या विक्रीमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने फक्त ३३५१ स्कूटर विक्री करू शकली.

कंपनी गेल्या काही महिन्यांपासून पुनर्रचनेचे काम करत आहे. ओला कार, ओला कार्स आणि क्विक कॉमर्स व्यवसाय ओला डॅश बंद झाल्यामुळे कंपनीने यापूर्वी सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

ओला कंपन्यांच्या प्रवक्त्याने कर्मचाऱ्यांच्या संख्येवर भाष्य करण्यास नकार दिला. ओला भारतातील सर्वात मोठी ईव्ही कंपनी, इलेक्टि्रक वाहने, ऑटोमेशनमध्ये अभियांत्रिकी आणि विकास व संशोधन क्षमता निर्माण करून नॉन-सॉफ्टवेअर अभियांत्रिकी डोमेनवर आपले लक्ष केंद्रित करत आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

कंपनीकडे सध्या सुमारे २ हजार अभियांत्रिकी आहेत.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर