मुंबई

मुंबईतील जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिका घेणार सल्लागाराची मदत

प्रतिनिधी

मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. समुद्र, नाले, खाड्या आदी ठिकाणी होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने पाण्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवल्या असून, सल्लागाराला तब्बल ९० लाख रुपये मोजणार आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे.

मुंबईत दररोज लाखो लिटर सांडपाणी समुद्र, नाले, खाडी यात मिसळते आणि या ठिकाणच्या प्रदूषणाला धोका निर्माण होतो. यामुळे जलचर प्राण्यांच्या जीवाला होणारा धोका लक्षात घेता पाण्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

सल्लागाराची नियुक्ती

या प्रकल्पांसाठी पाण्याचा अभ्यास उपयुक्त ठरणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली आहे. पाण्यातील विषारी घटक, मासे, वनस्पती व इतर जैवविविधतेवर होणारे परिणाम याचा या निमित्ताने शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य होणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या कामासाठी सल्लागार नेमला जाणार असून त्यासाठी सोमवारी निविदा मागवण्यात आली आहे. सल्ल्यापोटी पालिका सुमारे ९० लाख रुपये मानधन देणार आहे.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास