मुंबई

बॉम्बस्फोट धमकीचे ट्विट करणाऱ्याला अटक

मुंबई पोलिसांचे एक अधिकृत ट्विटर हँडल असून या हँडलवर सोमवारी एका अज्ञात व्यक्तीने एक मेसेज पाठविला होता

नवशक्ती Web Desk

मुंबई शहरात पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक ट्विट मुंबई पोलिसांना प्राप्त झाला असून या ट्विटनंतर स्थानिक पोलिसांनी एका तरुणाला नांदेडहून अटक केली. या तरुणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून धमकी देण्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा तपास सुरु आहे. दरम्यान, सतत बॉम्बस्फोटाच्या धमकीने मुंबई पोलीस प्रचंड हैरान झाले असून अशा व्यक्तीविरुद्ध ठोस कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांचे एक अधिकृत ट्विटर हँडल असून या हँडलवर सोमवारी एका अज्ञात व्यक्तीने एक मेसेज पाठविला होता. त्यात मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

IPO आक्रसणार; एनएसईसाठी भागधारकांनी घेतली माघार; सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम हुकणार

हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य हे वैश्यवाणीच; नोंदींच्या आधारे जात, वैधता प्रमाणपत्र देणार

पार्थ पवार यांना आरोपी का केले नाही? मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

Mumbai : गणेशोत्सवात विद्यापीठाचे दीड हजार ‘सारथी’; NSS चे विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला

Women Asia Cup 2026 : भारतीय महिला संघाचा आज बांगलादेशशी उपांत्य सामना; दुसऱ्या लढतीत पाकिस्तान-श्रीलंका आमनेसामने