मुंबई

सलग चार तास आगीचा सामना करणार रोबोट

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

प्रतिनिधी

आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोबो कूच करणार आहे. सलग चार तास सामना करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झुंज देणार असून, घटनेच्या ठिकाणचे फोटो पाठवणार आहे. पूर्व व पश्चिम उपनगरात दोन रोबोट दाखल होणार आहेत. यासाठी निविदा मागवल्या असून, दोन रोबोट खरेदीसाठी पालिका आठ कोटी रुपये खर्चणार आहे.

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाचे जवान जीवाची बाजी लावत दुसऱ्याचा जीव वाचवतात; मात्र आगीवर नियंत्रण मिळवताना अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्याबरोबर सतत पाण्याचा मारा करणे, आपत्कालीन परिस्थितीत कठीण होते. त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांच्या मदतीला रोबोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोबोट पायऱ्यांवर चढून आगीजवळ जाऊन पाण्याचा फवारा मारू शकणार आहे. हा रोबोट रिमोट कंट्रोलने हाताळता येणार आहे. तसेच रोबोटमुळे दुर्घटनेच्या ठिकाणच्या धोक्याची तीव्रता अग्निशमन दलाला समजणार आहे. यानुसार बचावकार्य करण्यासाठी कुमक वाढवणे, यंत्रणा वाढवून वेगाने उपाययोजना करणे सोयीस्कर ठरल्याने जीवित-वित्तहानी टाळण्यास मोठी मदत होणार असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी सांगितले.

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

Ind Vs Pak Asia Cup : ''भारतासमोर खेळण्याशिवाय पर्याय नाही''; अखेर BCCI ने सांगितले कारण

भारत-पाकिस्तान सामना : शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी रस्त्यावर; 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, पंतप्रधान मोदींना पाठवलं 'सिंदूर'

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरले; पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब