मुंबई

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच,रुपयाने नवा नीचांकी स्तर गाठला

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या दरात होत असलेली वाढ या पार्श्वभूमीवर रुपयाची घसरण होत असून डॉलर मजबूत होत आहे

वृत्तसंस्था

भारतीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरु असलेली घसरण बुधवारीही सुरु राहिली. बुधवारच्या व्यवहारा डॉलरच्या तुलनेत रुपया १८ पैशांनी घसरुन ७९.०३ हा नव्या नीचांकी स्तरावर गेला. भारतीय शेअर बाजारात चौथ्या दिवशी तेजी थांबली. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पैसे काढून घेणे सुरु राहणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या दरात होत असलेली वाढ या पार्श्वभूमीवर रुपयाची घसरण होत असून डॉलर मजबूत होत आहे.

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज बाजारात बुधवारी सकाळी रुपया घसरुन ७८.८६ वर उघडला आणि ११ पैशांच्या घसरणीसह ७८.९६ पर्यंत घसरला. घसरणीचा हा कल कायम राहिला. दिवसअखेरीस डॉलरच्या तुलनेत मागील बंद भाव लक्षात घेता रुपया ७९.०३ वर बंद झाला.

यापूर्वी, डॉलरच्या तुलनेत रुपयाने तब्बल ४६ पैशांनी लोटांगण घातल्याने मंगळवारी ७८.८३ ही नवी नीचांकी पातळी गाठली होती. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा सुरु राहिल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या दरात वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस