मुंबई

भारतीय शेअर बाजारात दोलायमान स्थितीनंतर सेन्सेक्स घसरला

बीएसई सेन्सेक्स गुरुवारी ८.०३ अंक किंवा ०.०२ टक्का घसरुन ५३,०१८.९४ वर बंद झाला.

वृत्तसंस्था

जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीमुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी दोलायमान स्थितीनंतर सेन्सेक्स किरकोळ म्हणजे आठ अंकांनी घसरला. दरम्यान, रुपयाला ५ पैशांचे बळ मिळून डॉलरच्या तुलनेत ७८.९८ झाला. इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये रुपया ७८.९२ वर उघडला. दिवसभरात तो ७८.९० ही कमाल आणि ७८.९९ ही किमान पातळी गाठल्यानंतर दिवसअखेरीस ५ पैशांनी वधारुन ७८.९८ वर बंद झाला. बुधवारी रुपया १८ पैशांनी घसरुन ७९.०३ या नीचांकी स्तरावर बंद झाला होता.

दि बीएसई सेन्सेक्स गुरुवारी ८.०३ अंक किंवा ०.०२ टक्का घसरुन ५३,०१८.९४ वर बंद झाला. दिवसभरात तो ३५०.५७ अंकांनी वधारुन ५३,३७७.५४ वर गेला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा घसरण झाली. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १८.८५ अंक किंवा ०.१२ टक्का घटून १५,७८०.२५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा स्टील आणि इंडस‌्इंड बँक यांच्या समभागात घसरण झाली. तर अॅक्सीस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी आणि लार्सन ॲण्ड टुब्रो यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात टोकियो, सेऊलमध्ये घसरण तर शांघायमध्ये वाढ झाली. युरोपियन बाजारत दुपारपर्यंत घट तर अमेरिकन बाजारात बुधवारी संमिश्र वातावरण होते.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.०४ टक्का घसरुन प्रति बॅरलचा भाव ११६.२ अमेरिकन डॉलर्स झाला आहे. विदेशी गुंतवणूक संस्थांनी बुधवारी भारतीय शेअर बाजारात ८५१.०६ कोटींच्या समभागांची विक्री केली.

BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू

आरोपी बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात; हातात बेड्या, गळ्यात दोरखंड, घोषणाबाजी करत अर्ज भरायला गेला, पण...

BMC Election : शिवसेना-मनसे जागावाटप अंतिम टप्प्यात - संजय राऊत

भीमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद; ९ जानेवारीपासून अंमलबजावणी

तुळजापुरात भीषण दुर्घटना! विहिरीतील मोटार काढताना शॉक लागला; बाप-लेकासह चौघांचा मृत्यू