मुंबई

राज्य सरकार खुल्या प्रवर्गातील लोकांचे शत्रू

प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील विद्यमान सरकार हे केवळ राज्यातील जनतेची फसवणूक करत असून, खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम करत आहे. ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’सारख्या योजनांच्या अंमलबजावणीनंतर केवळ दिखाव्यासाठी व लोकांना खुश करण्यासाठी ‘अमृत’सारख्या योजनांची योग्य ती अंमलबजावणी करत नसल्याने विद्यमान राज्य सरकार हे राज्यातील जनतेशी खेळ करण्याचे काम करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विद्यमान राज्य सरकार खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे नंबर एकचे शत्रू बनले आहे, असा घणाघाती आरोप हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित परिषदेत केला.

या पत्रकार परिषदेला आनंद दवे यांच्यासह मनोज तारे, विवेक परदेशी, सूर्यकांत कुंभार, राहुल आवटी व उमेश कुलकर्णी यांच्यासह हिंदू महासंघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनेही अमृतसारख्या योजनांकडे दुर्लक्ष केले होते. अमृत योजनांची ठोस अंमलबजावणी केली असती, तर खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत झाली असती. मात्र, कसबा विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे आणि हिंदू महासंघाला दिलेल्या आश्वासनानंतर सरकारने ‘अमृत’ची अंमलबजावणी करत असल्याचे आश्वासन दिले, मात्र ते आश्वासनही फोल ठरल्याचा आरोप दवे यांनी केला आहे.

सारथी, बार्टी, महाज्योती सारख्या योजना लागू असणाऱ्या समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी पूर्ण प्रशिक्षणाची तरतूद असताना अमृत योजनेत मात्र त्यासाठी काहीही तजवीज करण्यात आली नाही. यावरून सरकारची नीयत योग्य नसल्याचे दिसून येते. एव्हढेच नाही तर अमृत योजनेत पात्र विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिम मुलाखतीसाठी बसभाडे विद्यार्थ्यांना दिले जाईल. हा प्रकार म्हणजे खुल्या प्रवर्गातील युवा विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. अमृतसारख्या योजनांमध्ये सरकार एकापेक्षा एक मोठे विनोद करीत आहे. अमृत योजनेचे सर्व कोर्सेस हे ऑनलाईन असल्याचे सरकारने घोषित केले. परंतु वायरमन, एसी, फीटर व प्लंबरसारखे कोर्सेस ऑनलाईन होऊ तरी कसे शकतात, याबाबत शासनाने योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

"एकनाथ शिंदेंना अपमानित करायचं नव्हतं..." देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

"उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

ज्याला देव मानलं त्यानंच केला घात... नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला बलात्कार

लॉटरीच की! फक्त ९ हजारात मिळतोय सॅमसंगचा 'हा' 5G स्मार्टफोन; जाणून घ्या काय आहे फीचर्स?

"उद्धव ठाकरेंना १९९९मध्ये मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती म्हणून...", देवेंद्र फडणवीस यांचा दावा