मुंबई

शेअर बाजारात दोन दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा घसरगुंडी सुरु

वृत्तसंस्था

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारात दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारी पुन्हा घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स ७०९.५४ अंकांनी घसरला. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा सुरुच असल्याने बाजारातील घसरणीचे आणखी एक कारण ठरले.

दि ३०-बीएसई सेन्सेक्स ७०९.५४ अंक किंवा १.३५ टक्के घसरुन ५१,८२२.५३वर बंद झाला. दिवसभरात तो ७९२.०९ ने घसरुन ५१,७३९.९८ झाला होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २२५.५० अंक किंवा १.४४ टक्के घटून १५,४१३.३० वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत टाटा स्टील, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडस‌्इंड बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फिनसर्व, टायटन आणि बजाज फायनान्स यांच्या समभागात घसरणझाली. तर दुसरीकडे टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर लि., पॉवरग्रीड आणि मारुती सुझुकी इंडिया यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात सेऊल, शांघाय आणि टोकियोमध्ये घसरण झाली. तर युरोपियन बाजारात दुपारपर्यंत नकारात्मक व्यवहार सुरु होते. अमेरिकन बाजारपेठेत मंगळवारी वाढ झाली. तसेच बीएसई सेन्सेक्स मंगळवारी ९३४.२३ अंक किंवा १.८१ टक्के तर निफ्टी २८८.६५ अंक किंवा १.८८ टक्के वधारला होता.

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ४.१९ टक्के घसरुन प्रति बॅरलचा भाव १०९.८ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारी भारतीय शेअर बाजारातून २७०१.२१ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

'ही' परवडणारी कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! ग्राहकांना लावलंय वेड

जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य

आई-बापानेच मुलगी, नातवाच्या मदतीने केली स्वतःच्या मुलाची हत्या

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!