मुंबई

मुंबई, उपनगरातील तापमानातील फरक चक्रावणारा; तापमानात १३ अंशांपर्यंत फरक

वातावरण बदलाचा मोठा फटका जगभरात बसत आहे. याचे मोठे परिणाम दैनंदिन तापमानावर होताना दिसत आहेत.

Swapnil S

मुंबई : वातावरण बदलाचा मोठा फटका जगभरात बसत आहे. याचे मोठे परिणाम दैनंदिन तापमानावर होताना दिसत आहेत. मुंबई व उपनगरातील तापमानात १३ अंशांपर्यंत फरक दिसत आहे. हा फरक तज्ज्ञांनाच चक्रावणारा असून त्याचे परिणाम मुंबईकर व उपनगरातील नागरिकांवर होऊ शकतात. ‘रिस्पायर लिव्हिंग सायन्सेस’ या स्टार्टअपने मुंबई व उपनगरातील हवामान बदलाचा अभ्यास केला.

१ ते २२ दरम्यान वसई (प.) व घाटकोपर येथील सरासरी तापमान अनुक्रमे ३३.५ व ३३.३ अंश नोंदवले गेले, तर पवई या हरित भागातीलतापमान २०.४ अंश होते. एकाच शहरातील दोन भागातील तापमानात जवळपास १३ अंशाचा फरक आढळला. भरपूर शहरी क्षेत्र आणि शहराचे कमी विकसित किंवा हिरवे भाग यांच्यातील तापमानातील लक्षणीय फरक जाणवत आहे. उष्णता टिकवून ठेवणाऱ्या काँक्रीट इमारती आणि रस्ते, वनस्पतींचा अभाव आणि स्थानिक प्रदूषण पातळी प्रामुख्याने तापमानातील फरक वाढवतो.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता