मुंबई

स्टोन बसविण्यासाठी ठेवलेल्या ३७ लाखांच्या दागिन्यांची चोरी

पळून गेलेल्या करणचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. लवकरच त्याला चोरीच्या मुद्देमालासह अटक केली जाईल असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

प्रतिनिधी

मुंबई- स्टोन बसविण्यासाठी कारखान्यातील कपाटात सुरक्षित ठेवलेल्या सुमारे ३७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिन्यासह कॅश घेऊन नोकराने पलायन केले. याप्रकरणी करण सोनी या कारागिर नोकराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रल्हाद मदन भारती हे ज्वेलर्स व्यापारी असून ते काळबादेवी परिसरात राहतात. त्यांचा सोन्याच्या दागिन्यांवर स्टोन बसविण्याचा कारखाना असून या व्यवसायात त्यांचे इतर दोन भागीदार आहेत. त्यांच्याकडे तीन कारागिर असून त्यात करण सोनीचा समावेश होता. रविवार ३ डिसेंबरला त्यांच्या भागीदाराच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यामुळे ते त्यांच्या कारागिरासोबत वाढदिवसानिमित्त भाईंदर येथील त्याच्या घरी गेले होते. करण हा प्रकृती ठिक नसल्याचा बहाणा करुन कारखान्यात थांबला होता.

दुसर्‍या दिवशी ते कारखान्यात आले होते. यावेळी तिथे करण नव्हता. त्यामुळे त्यांनी करणला फोन केला असता त्याने तो चहा पिण्यासाठी बाहेर आल्याचे सांगिलते. मात्र बराच वेळ होऊन तो कारखान्यात आला नाही.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कपाटाची पाहणी केली. यावेळी कपाटातून स्टोन बसविण्यासाठी ठेवलेले सुमारे ३७ लाख रुपयांचे दागिने आणि ५० हजार रुपयांची कॅश चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा करणला फोन केला. मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. करण याने दागिन्यांसह कॅशची चोरी केयाची खात्री होताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर करण सोनीविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या करणचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. लवकरच त्याला चोरीच्या मुद्देमालासह अटक केली जाईल असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक