मुंबई

आजपासून 'या' नियमावलीत बदल; जाणून घ्या हे पाच बदल...

१ नोव्हेंबर २०२२ पासून काही बदल होणार आहेत, पाहूया या नव्या बदलांमुळे दिलासा मिळतोय कि खिशाला कात्री?

प्रतिनिधी

१ नोव्हेंबर २०२२ पासून काही बदल होणार आहेत, पाहूया या नव्या बदलांमुळे दिलासा मिळतोय कि खिशाला कात्री?

महागाईच्या वाढत्या गर्तेत होणाऱ्या या पाच बदलांमुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम, फक्त तुमच्या खिशावरच परिणाम करणारा नाही तर तुमच्या लाईफ इन्शुरन्स क्लेमसाठी ही तितकाच महत्वाचा आहे

१) रेल्वे वेळापत्रकात बदल :-

भारतीय रेल्वे 1 ऑक्टोबरपासून आपले नवे वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे. त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नवीन वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे अनेक गाड्यांच्या आगमन-निर्गमनाच्या वेळेत बदल होणार आहे. याशिवाय उत्तर रेल्वेने 24 गाड्यांची श्रेणी बदलण्याची घोषणा केली आहे.

) LPG गॅस सिलेंडर च्या दरात बदल :-

दरमहा १ तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल केला जातो. या ही महिन्यात १४ आणि १९ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत बदल केले जाणार आहेत. १ ऑक्टोबरला कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५.५ रुपयांची घट केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅस सिलेंडरच्या किंमती जास्त असल्यामुळे, उद्या LPGच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.

३) सिलेंडर डिलेव्हरी प्रक्रियेत बदल :-

उद्यापासून गॅस सिलिंडर ओटीपी दिल्यानंतरच डिलिव्हर केला जाणार आहे. ग्राहकाच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी पाठविला जाणार आहे. तो डिलिव्हरी एजंटला द्यायचा आहे. त्यानंतरच सिलिंडर मिळणार आहे. ग्राहकांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी डिलिव्हरी एजन्टला द्यायचा. त्यानंतरच सिलेंडर मिळेल.

४) विमा नियामक बदल :-

विमा धारकांसाठी हा एक महत्वाचा बदल असू शकतो. नोव्हेंबरच्या एक तारखेपासून IRDAI कडून मोठा बदल केला जाऊ शकतो. विमा धारकांना नॉन- लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना KYC तपशील प्रदान करण्यास अनिवार्य करण्याची शक्यता आहे. विमा दावा करताना KYC कागदपत्रे सादर न केल्यास दावा रद्द होऊ शकतो.

५) GST रिटर्नबाबत बदल :-

याआधी GST करदात्यांना GST रिटर्नमध्ये फक्त दोन अंकी HSN कोड नमूद करावा लागत होता,मात्र आतापर्यंत पाच कोटींपेक्षा कमी टर्नओव्हर असलेल्या करदात्यांना चार अंकी HSN कोड नमूद करणे बंधनकारक असेल.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी