मुंबई

अंधेरी परिसरात आज, उद्या पाणी नाही

के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगमवाहिनीवरील (आऊटलेट) झडपा (वॉल्व्ह) बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगमवाहिनीवरील (आऊटलेट) झडपा (वॉल्व्ह) बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे अंधेरी परिसरात गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत १८ तास काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

महानगरपालिकेच्या के - पूर्व विभागातील वेरावली जलाशय-२ येथे ७५० मिलीमीटर व्यासाच्या पार्ले वेसावे (वर्सोवा) निगमवाहिनीवरील (आऊटलेट) चार झडपा बदलण्यात येणार आहेत. यामुळे गुरुवार व शुक्रवारी या परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हे काम केले जाणार आहे. त्यामुळे, या कालावधीदरम्यान के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहील.

या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम

के पूर्व - महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, एमएमआरडीए वसाहत, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर ए पंजाब, बिंद्रा संकुल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर, सुंदर नगर, गौतम नगर, मॉडर्न बेकरी, प्रजापूरपाडा त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, अचानक कॉलनी, कलेक्टर कंपाऊंड, सारीपूत नगर, दुर्गानगर, मातोश्री क्लब, सी.डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी मार्केट, भर्डावाडी, नवरंग सिनेमाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे गार्डन पंप व गझदर पंप, गिल्बर्ट हिलचा काही भाग, तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरीचा काही भाग.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी