मुंबई

मध्य व हार्बर मार्गावर आज ब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर रद्द

हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत कुर्ला व वाशी स्थानकांदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून पनवेल-बेलापूर-वाशी स्थानकात जाणाऱ्या लोकल सेवा बंद असणार आहेत.

Swapnil S

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, १४ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर कुर्ला व वाशी स्थानकादरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत काही लोकल रद्द केल्या असून, काही लोकल उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू असणार आहे. या कालावधीत मुलुंड स्थानकातून सुटणाऱ्या मुलुंड-कल्याण स्थानकादरम्यानच्या लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा व डोंबिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत, तर कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या अप धीम्या-सेमी जलद लोकल कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या कालावधीत धावणाऱ्या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबत आहेत.

हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत कुर्ला व वाशी स्थानकांदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून पनवेल-बेलापूर-वाशी स्थानकात जाणाऱ्या लोकल सेवा बंद असणार आहेत.

कुर्ला व पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला व पनवेल-वाशी या दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावत आहेत.

ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवासाची मुभा

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी-नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत