मुंबई

व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करून दागिने पळविले

गुन्हेगारांना अवघ्या तीन तासांत एल. टी मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने केली अटक

नवशक्ती Web Desk

मुंबई : व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करून घातक शस्त्रांचा धाक दाखवून सोन्याचे दागिन्याचे पार्सल पळविणाऱ्या तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अवघ्या तीन तासांत एल. टी मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. निलेश हरिहर तिवारी, अभिराज अशोक खिलारी आणि सिल्वराज ऊर्फ काला सिल्व्हा वेलुतंबी पिल्ले अशी या तिघांची नावे आहेत. या आरोपींकडून ३३ लाख ४५ हजाराचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार व्यापारी असून, त्यांचा सोन्या-चांदीचे दागिन्याचे पार्सल विविध ठिकाणी पोहचविण्याचा व्यवसाय आहे. मंगळवार, २७ जूनला ते त्यांच्या सहकार्‍यासोबत दागिन्यांचे पार्सल पुणे, कोल्हापूर येथील पार्टीला देण्यासाठी कारमधून जात होते.

यावेळी त्यांच्या कारला अडवून तिघांनी त्यांच्याकडे २५ हजाराच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर या तिघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून दागिन्याचे पार्सल घेऊन पलायन केले होते. घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना देऊन तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी खंडणीसह लुटमारीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता.

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

Period Problems : महिन्यातून दोनदा पाळी येतेय? महिलांनो, दुर्लक्ष करू नका; डॉक्टर सांगतात...