मुंबई

यंदाच्या वर्षी गणेशभक्तांची शाडूच्या मूर्तींना पसंती,पीओपीच्या मूर्तींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

प्रतिनिधी

यंदाच्या वर्षी पीओपीच्या गणेशमूर्ती विराजमान करण्यास राज्य सरकार व मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे, तरीही गणेशभक्तांनी शाडूच्या मातीच्या मूर्तींना पसंती दिली आहे. गेल्या काही दिवसांत शाडू मातीच्या मूर्तींच्या मागणीत वाढ झाल्याचे डिलाइल रोड येथील मूर्तिकार राजन झाड यांनी सांगितले.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यास निर्बंध होते; मात्र यंदा चौथ्या लाटेचे संकट असले तरी धोका कमी असल्याने गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करता येणार आहे. जगभरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची परंपरा व आनंद थोडा हटकेच असतो. ३१ ऑगस्ट रोजी सगळ्यांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून भक्तगण स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

मुंबईत यावर्षी पीओपीच्या मूर्तींना परवानगी असली तरी घरगुती आणि मंडळांकडून गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांकडे शाडूच्याच मूर्तीची मागणी करण्यात येत आहे. दरवर्षी पीओपीच्या मूर्ती बनवणार्‍या मंडळांपैकी १५ ते २० टक्के मंडळांनी आणि घरगुती उत्सवासाठी सर्वाधिक शाडूच्याच मूर्तींची मागणी करण्यात येत आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल