मुंबई

वाढीव पगारापासून हजारो कर्मचारी वंचित

Swapnil S

मुंबई : सहाव्या वेतन आयोगाने शिफारस केलेल्या वेतन निश्चितीसाठी वेतन विसंगती सुधारणा समितीने दिलेला अहवाल ऑक्टोबर २०२३ रोजी मंजूर होऊन परिपत्रक जारी झाले; मात्र त्यानंतरही अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेने केलेली नाही. त्यामुळे पालिकेचे हजारो कर्मचारी कर्मचारी वाढीव पगारापासून वंचित राहत आहेत.

वेतन विसंगती सुधारणा समिती अहवालाच्या आधारे उपप्रमुख लेखापालांनी (आस्थापना/२) २३ ऑक्टोबर २०२३ अन्वये परिपत्रक जारी केले. परिपत्रकानुसार नोव्हेंबर २३ पासून वेतनात वाढीव रकमेचा समावेश होणे अपेक्षित होते; मात्र डिसेंबरच्या वेतनापर्यंतही रक्कम जमा झालेली नाही. पालिका प्रशासनाने यापूर्वीची थकबाकीची रक्कम पुढील तीन वर्षांत म्हणजे २०२४ ते २०२६ या वर्षात तीन टप्प्यात द्यायची आहे; मात्र अद्याप वाढीव रक्कम देण्यात न आल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व विभागांच्या आस्थापनांनी वेतन निश्चिती करून ठेवली असली, तरी लेखापाल (कोषागार) विभागाकडून आदेश जारी केले जात नाहीत. वरिष्ठांकडून आदेश आले नसल्याची कारणे दिली जात असल्याची माहिती दि म्युनिसिपल युनियनचे रमाकांत बने यांनी दिली.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल