प्रातिनिधिक फोटो
मुंबई

विनयभंग करून ॲसिड हल्ल्याची धमकी, पोलिसांच्या कारवाईने भोईवाड्यात एकाला अटक

एका चौदा वर्षांच्या मुलीशी अश्‍लील वर्तन करून तिच्यावर असिड हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याची घटना भोईवाडा येथे घडली आहे.

Swapnil S

मुंबई : एका चौदा वर्षांच्या मुलीशी अश्‍लील वर्तन करून तिच्यावर असिड हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याची घटना भोईवाडा येथे घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच दशरथ नावाच्या एका ३८ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. तर बोरिवली येथे एका घटनेत १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका रिक्षाचालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

चौदा वर्षांच्या मुलीशी अश्‍लील वर्तन करून असिड हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या दशरथ नावाच्या एका ३८ वर्षांच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. शिवडी येथे तिच्या कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या एका मुलीचा गेल्या काही दिवसांपासून दशरथ हा पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. २८ ऑगस्टला त्याने मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला होता. तिच्या पालकांना हा प्रकार समजताच त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.

दुसऱ्या घटनेत बोरिवली अल्पवयीन मुलींच्या विनयभंगप्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद फरार रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे. बोरिवली परिसरात राहणारी पंधरा वर्षांची मुलगी शाळेत रिक्षाने जात होती. रिक्षा बीएमसी गार्डनजवळ येताच चालकाने रिक्षा बंद पडल्याची बतावणी करून तिच्याशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती