Mumbai : एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा मृत्यू 
मुंबई

Mumbai : एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा मृत्यू

विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरात एकाच कुटुंबातील तीन अविवाहित भावंडांचे मृतदेह बंद घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

प्रतिनिधी

कीर्ती केसरकर

विरार : विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरात एकाच कुटुंबातील तीन अविवाहित भावंडांचे मृतदेह बंद घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. कुमार मेहता (५०), दिपेश मेहता (५२) आणि खेवना मेहता (४८) अशी मृतांची नावे आहेत. गंभीर आजारपण आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांनी विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

‘गार्डन अव्हेन्यू’ इमारतीच्या ‘डी’ विंगमधील फ्लॅट क्रमांक १२०३ मध्ये ही भावंडे २०२५ पासून भाड्याने राहत होती. बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बोळिंज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला असता तिघांचे मृतदेह आढळले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांच्या प्राथमिक माहितीनुसार, तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा. मृत्यूपूर्वी भावंडांनी गुजराती भाषेत व्हिडीओ चित्रित केला होता. एका भावाला पक्षाघात, तर दुसऱ्याला कर्करोग असल्याची माहिती त्यातून समोर आल्याचे सांगितले जाते. भावंडांनी काही दिवसांपूर्वी विवाहित बहिणीकडे आर्थिक मदत मागितल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी बोळिंज पोलीस तपास करत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘एमसीए’ने 'एनसीएलटी'वर पूर्णपणे ताबा मिळवलाय; सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी

नाशिक : ध्वजारोहणासाठी गोदाकाठ सजला; राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी डीएमएक्स पिक्सेल थ्रीडी मॅपिंगसह आकर्षक रोषणाई

कंत्राटदारांचे आजपासून 'फोन करो' आंदोलन; थकीत ८६ हजार कोटी देण्याची मागणी

'नागपूरमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो' - चंद्रशेखर बावनकुळे

२०१९ नंतर उद्धवजींनी मला बोलावलेच नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस