फोटो : सलमान अंन्सारी
मुंबई

निसर्ग उन्नत मार्गात तिकीट स्कॅनिंगचा अडथळा; तिकीट घर बंद असल्याने अनेक पर्यटकांचा हिरमोड

सिंगापूर येथील ‘ट्री टॉप वॉक’च्या धर्तीवर मलबार हिल येथे समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी आणि सरपटणारे प्राणी न्याहाळण्यास संधी देणाऱ्या निसर्ग उन्नत मार्गाला मुंबईकरांसह पर्यटकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Swapnil S

पूनम पोळ/मुंबई

सिंगापूर येथील ‘ट्री टॉप वॉक’च्या धर्तीवर मलबार हिल येथे समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी आणि सरपटणारे प्राणी न्याहाळण्यास संधी देणाऱ्या निसर्ग उन्नत मार्गाला मुंबईकरांसह पर्यटकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पहाटे ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत एका तासाच्या भागात एकावेळी २०० पर्यटकाना या ठिकाणी प्रवेश मिळतो. पर्यटकांना तिकीटचे स्कॅनिंग करताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रत्यक्षातही भेट देणाऱ्या पर्यटकांचाही हिरमोड होत आहे.

निसर्ग उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी २०२१ साली महापालिकेची मंजुरी मिळाली आहे. . निसर्गाचा समतोल राखून बनवलेली ही पाऊलवाट पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने आदर्श ठरत असली तरी याचा आस्वाद कित्येक पर्यटकांना घेता येत नाही. प्रशासनाने आखून दिलेल्या नियमातून निसर्ग उन्नत मार्ग येथे भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन सशुल्क ऑनलाईन तिकीट काढण्याचा प्रयत्न केला असता क्यू आर कोड स्कॅन होताना तांत्रिक अडचणी येत आहेत.

क्यू आर स्कॅन करताना तांत्रिक अडचणी

आम्ही मागील काही दिवसापासून तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण क्यूआर कोड स्कॅन करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. माझ्या दुसऱ्या मित्राचे खात्यावरून पैसे वजा झाले पण तिकीट निघाले नाही. अशी प्रतिक्रिया वसई येथून प्रणित जगडाळे यांनी दिली.

तिकीट घर बंद

ऑनलाइन तिकीट काढताना अडचणी निर्माण होत असल्याकारणाने आम्ही प्रत्यक्षात तिकीट काढायचे ठरवले . परंतु. येथे तिकीट घरचं उघडे नाही.त्यामुळे आमचा हिरमोड झाला. पालिकेने याबाबत काही तरी करावे जेणेकरून आम्हालाही या जागेचा आनंद घेता येईल, अशी प्रतिक्रिया सपत्नीक आलेल्या विनय भाटकर यांनी दिली.

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

मानखुर्दमध्ये क्रेन दुर्घटना : कंत्राटदाराला एक कोटींचा दंड