पर्यावरणाच्या रक्षणासाठी इलेिक्ट्रक बसेसचा समावेश बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात करण्यात येत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत तब्बल २,१०० इलेिक्ट्रक बसेस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार असून, त्यानंतर लवकरच प्रवाशांच्या सेवेत त्या धावणार आहेत.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने बृहन्मुंबई इलेिक्ट्रक सप्लाय अॅण्ड ट्रान्सपोर्टकडून २,१०० इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याची मागणी बेस्ट उपक्रमाने केली होती. या २,१०० इलेिक्ट्रक बसेसची एकूण किंमत ३,६७५ कोटींच्या घरात आहे. ऐव्हरी ट्रेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बेस्ट उपक्रमाकडून पुरस्कार देण्यात आला आहे. १२ वर्षांच्या कालावधीसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट मॉडेलवर २,१०० इलेिक्ट्रक बसेसचा पुरवठा १२ महिन्यांत करण्यात येणार आहेत. इलेिक्ट्रक मोबिलिटीमध्ये असलेली ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या करारानुसार १२ मीटर एसी बसेस पुरवणार आहे.