मुंबई

मुंबईतले ‘टॉप टेन’ प्रॉपर्टी टॅक्स भरणारे कोण? बघा लिस्ट; BMC कडून शनिवारी-रविवारीही कर भरण्याची सुविधा

मार्च अखेरपर्यंत साडेचार हजार कोटींचा मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत १,७०० कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला असून पुढील १० दिवसांत...

Swapnil S

मुंबई : मार्च अखेरपर्यंत साडेचार हजार कोटींचा मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत १,७०० कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला असून पुढील १० दिवसांत अडीच हजार कोटींचा कर वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील १० दिवसांत ६ सुट्ट्या आहेत. सुट्टीच्या दिवशी मालमत्ता धारकांना कर भरता येण्यासाठी सार्वजनिक सुट्टीसह शनिवार व रविवारी मालमत्ता कर भरणा केंद्र सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने २०२३-२४ या उदिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर संकलित करण्यासाठी पालिकेकडून विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस पाठवल्यानंतर मायकिंग, दर्शनीय ठळक बॅनर तसेच स्थानिक केबल, प्रसार माध्यम आणि समाज माध्यमांद्वारे जनजागृती तसेच मोबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत आवाहन केले जात आहे. ३१ मार्च २०२४ हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यापूर्वी आपल्या मालमत्तेसंबंधीचे कर भरण्यासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात संबंधित प्रशासकीय विभागांमध्ये येत आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात २३ आणि २४ मार्च रोजी साप्ताहिक सुटी आहे. तर, २५ मार्च रोजी धुलिवंदन आणि २९ मार्च रोजी गुड फ्रायडेनिमित्त सार्वजनिक सुटी आहे. त्यावेळी, मालमत्ता करभरणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या कालावधीत कर भरताना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील साप्ताहिक आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान, नागरिकांना करभरणा करताना येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी या कालावधीत करसंकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

‘टॉप टेन’ मालमत्ता करधारक

  • न्यू लूक कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि (एफ उत्तर विभाग) – १४ कोटी ४८ लाख ८९ हजार २४१ रुपये

  • श्री. साई ग्रुप ऑफ कंपनीज (के पश्चिम विभाग) – १४ कोटी ०७ लाख ९४ हजार ९८३ रुपये

  • कल्पतरू रिटेल व्हेंचर्स प्रा. लि. (एच पूर्व विभाग)- १० कोटी ७० लाख ७२ हजार १६२ रुपये

  • एव्हीएएलपी (आर मध्य विभाग)- १० कोटी ३८ लाख ७१ हजार ६६८ रुपये

  • न्यू लूक कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि (एफ उत्तर विभाग) – ०८ कोटी ९२ लाख ४४ हजार ६३१ रुपये

  • पीआरएल अगस्त्य प्रा. लि. (एल विभाग)- ०७ कोटी ४२ लाख ९५ हजार ८९४ रुपये

  • चंपकलाल के वर्धन आणि कंपनी- (जी उत्तर विभाग)- ०४ कोटी ९४ लाख ९१ हजार ०७० रुपये

  • केबल कॉर्पेारेशन ऑफ इंडिया- (आर मध्य विभाग) ०३ कोटी ५४ लाख ७० हजार २५३ रुपये

  • द टिंबर मार्केट (ई विभाग)- ०१ कोटी ५४ लाख १० हजार ४३८ रुपये

  • सुप्रीम सुखधाम (एच पश्चिम विभाग)- ०१ कोटी २२ लाख २४ हजार ३५२ रुपये

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी