मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आज वाहतूक ब्लॉक; बोरघाटमार्गे मुंबई वाहिनीवरील सर्व जड, अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद 
मुंबई

मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आज वाहतूक ब्लॉक; बोरघाटमार्गे मुंबई वाहिनीवरील सर्व जड, अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रॉकफॉल प्रतिबंधात्मक कामाअंतर्गत बसविण्यात आलेल्या जाळीमध्ये अडकलेले दगड काढण्याचे काम गुरुवार, १८ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रॉकफॉल प्रतिबंधात्मक कामाअंतर्गत बसविण्यात आलेल्या जाळीमध्ये अडकलेले दगड काढण्याचे काम गुरुवार, १८ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे.

या कालावधीत द्रूतगती मार्गावरुन बोरघाटमार्गे प्रवास करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जड व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत.

बोरघाटमार्गे मुंबई वाहिनीवरील किमी. क्र. ५९.००० पासून सर्व जड-अवजड वाहनासांठी वाहतूक वरील कालावधीमध्ये पूर्णत: बंद राहणार आहे. बोरघाट मार्गे पुणे वाहिनीवरील कि.मी. क्र.३०/००० पासून सर्व जड-अवजड वाहनासांठी वाहतूक पूर्णत: कामाच्या वेळी बंद राहील. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी मोटार वाहने व बसेस, प्रवासी वाहने ही वाहतूक कि.मी. क्र. ५९.००० पासून कनेक्टिंग लिंकमार्गे मुंबईकडे सुरू राहणार आहे.

मुंबईकडून पुण्याकडे जाणारी हलकी मोटार वाहने व बसेस तसेच प्रवासी वाहने ही कि.मी. क्र ३९/०० येथून कनेक्टिंग लिंकमार्गे पुणेकडे सुरू राहणार आहे.

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर नको; सर्व काही ठप्प करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

Mumbai : रस्ते धुलाईला ब्रेक! पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आठ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

'एसटी'च्या भूखंडांवर व्यावसायिक इमले; प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक