Mumbai : कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील अतिक्रमणे पाडणार; रेल्वे सुरक्षा क्षेत्रात कारवाईचा मार्ग मोकळा (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : 'तृतीयपंथीही विनयभंगाची तक्रार करू शकतात'

एखादी व्यक्ती तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) असली तरीही ती स्वतःची ओळख महिला म्हणून सांगत असल्यास, तिच्या बाबतीत भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ७५ अंतर्गत महिलांचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

उर्वी महाजनी

मुंबई : एखादी व्यक्ती तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) असली तरीही ती स्वतःची ओळख महिला म्हणून सांगत असल्यास, तिच्या बाबतीत भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ७५ अंतर्गत महिलांचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

विवाहाचे आमिष दाखवून एका तृतीयपंथी महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या विशाल इंगळे या भारतीय लष्करातील 'अग्निवीर'चा दोषमुक्तीचा (डिस्चार्ज) अर्ज न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांनी ३ नोव्हेंबरला फेटाळून लावला. पोलिसांनी इंगळेविरुद्ध बीएनएसच्या कलम ७५ (महिलांच्या विनयभंगाशी संबंधित), कलम २९६ (अश्लीलता) आणि तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९ च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता.

आपल्याविरुद्ध कलम ७५ लावण्याला इंगळेने न्यायालयात आव्हान दिले होते. तक्रारदार ही तृतीयपंथी व्यक्ती असून ती 'महिला' नाही, असा युक्तिवाद त्याने केला होता. मात्र, तक्रारदाराने स्वतःची ओळख महिला म्हणून दर्शवली असून आपल्या लैंगिक ओळखीनुसार शरीरात बदल घडवून आणण्यासाठी ती हार्मोनल उपचार घेत असल्याचे न्यायालयाने निदर्शनाला आणून दिले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग; पार्थ यांनी घेतली शरद पवारांची भेट; शशिकांत शिंदे, आव्हाड यांच्या उपस्थितीत चर्चा

पर्यावरण मंत्र्यांचे पर्यावरणाचे ज्ञान शून्य; कर्जतमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचे टीकास्त्र

आणीबाणी ही चूक; सोनिया गांधी यांचे विधान, इंदिराजींनाही खंत वाटल्याचा मुलाखतीत दावा

गोकुळमध्ये रस नाही; सरकारी संचालक नेमण्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा