मुंबई

'व्हिस्टाडोम कोच'ला प्रवासांची पसंती: ११ महिन्यांत दीड लाख प्रवाशांची सफर; २१.९५ कोटींचा महसूल जमा

मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस ९९.५० टक्के म्हणजेच २६,२६९ प्रवाशांसह सर्वात पुढे आहे. त्यानंतर मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये. काचेचे टॉप आणि रुंद खिडक्यातून अतभूत नजारा डोळ्यात कैद करत सेल्फी काढण्याचा वेगळा अनुभव तोही मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम डब्यात. व्हिस्टाडोम प्रवाशांच्या पसंती उतरली आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत व्हिस्टाडोम डब्यातून १.४७ लाख प्रवाशांनी प्रवास केला, तर प्रवाशांच्या माध्यमातून २१.९५ कोटी रुपयांचा महसूल मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

२०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेवर जोडण्यात आला. त्यानंतर प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई-मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला. या डब्यांच्या लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जून २०२१ पासून सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन १५ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन व्हिस्टाडोम डेक्कन क्वीनला जोडण्यात आले. प्रगती एक्स्प्रेसमध्ये २५ जुलै २०२२ पासून तसेच पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमधील एक व्हिस्टाडोम कोच १० ऑगस्ट २०२२ पासून सुरू आहे. व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्ये आहेत. व्हिस्टाडोममध्ये विशेष म्हणजे व्ह्यूइंग गॅलरी आहे.

मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस ९९.५० टक्के म्हणजेच २६,२६९ प्रवाशांसह सर्वात पुढे आहे. त्यानंतर मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस ९७.१३ टक्के म्हणजेच २५,६४४ प्रवासी, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, ९४.८ टक्के २५,०३० प्रवासी आहेत. मुंबई- करमाळी- ९१.०२ टक्के म्हणजेच २४,०३१ प्रवासी असलेल्या मुंबई तेजस एक्सप्रेस आणि पुणे- सिकंदराबाद -पुणे शताब्दी एक्सप्रेस ७६.७८ टक्के म्हणजेच २०,२७२ प्रवासी आहेत.

'अशी' झाली महसुलात वाढ

मुंबई- करमाळी-मुंबई तेजस एक्स्प्रेस ६.१८ कोटी उत्पन्नासह सर्वात पुढे आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस ५.१४ कोटी उत्पन्न आहे. पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस ४.१६ कोटी, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन २.२९ कोटी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस २.२० कोटी आणि मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसचा महसूल १.९८ कोटी इतका आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक