PM
मुंबई

उड्डाणपुलावरील धोकादायक फांद्यांची छाटणी ;दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम

नागर‍िकांच्‍या व व‍िशेषत: मुंबई शहरातील दुचाकी वाहनचालकांच्‍या सुरक्ष‍तेकरिता ही व‍िशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : झाडांच्या फांद्यामुळे अपघात होण्याचा धोका लक्षात घेता, मुंबईतील उड्डाणपुलावर लटकणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याची मोहीम पालिकेच्या उद्यान विभागाने हाती घेतली आहे. रविवारपर्यंत ही मोहीम फत्ते करण्याचे उद्दीष्ट उद्यान विभागाचे आहे.

मुंबईतील रस्ते अपघात टाळण्यासाठी पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार पालिकेच्या उद्यान विभागाने उड्डाणपुलावर लटकणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नागर‍िकांच्‍या व व‍िशेषत: मुंबई शहरातील दुचाकी वाहनचालकांच्‍या सुरक्ष‍तेकरिता ही व‍िशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम रविवारपर्यंत फत्ते करण्याचे उद्दिष्ट आहे. उड्डाणपुलावरील धोकादायक फांद्यांची छाटणी करताना वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी मनुष्यबळ तैनात केले आहे. तरीही वाहनचालकांनी पालिकेच्या या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन केल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

या पुलांवर फांद्या छाटणीची मोहीम

लालबाग, जे.जे. नानालाल मेहता, सायन, विलेपार्ले पश्चिम उड्डाणपूल, गोवंडी, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मालाड उड्डाणपूल या उड्डाणपुलावरील फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे.

चाचपडते विरोधक, धडपडते सरकार

मारू नये सर्प संताचिया दृष्टी

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश