मुंबई

क्षयरोग कंत्राटी कामगार दिवाळी बोनसविना कामगारांमध्ये नाराजी

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीसाठी २६ हजार सानुग्रह अनुदान देण्यात आले. यामध्ये आरोग्यसेविका, क्षयरोग कंत्राटी कामगार, कर्मचारी आदी संवर्गातील कर्मचाऱ्यांनाही दिवाळी भेट देण्याचे आदेश दिले. पालिका कर्मचारी, आरोग्य सेविका यांना दिवाळीत सानुग्रह अनुदान मिळाले. मात्र दिवाळी संपली तरी अद्याप क्षयरोग कंत्राटी कामगार, कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळालेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे सदर कामगारांना त्वरित दिवाळी भेट देण्यात यावी, अशी मागणी मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सानुग्रह अनुदान दिले जाते. मागील वर्षी २२ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व कामगार संघटनांच्या झालेल्या बैठकीत २६ हजार सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार पालिका कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान व आरोग्य सेविकांना ११ हजार दिवाळी भेट मिळाली. परंतु क्षयरोग कंत्राटी कामगार, कर्मचाऱ्यांना अद्याप दिवाळी भेट मिळालेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये अंसंतोषाचे वातावरण आहे.

प्रशासनाने दिवाळी भेट देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली असल्याची माहिती समन्वय समितीने दिली. यावेळी वामन कविस्कर, बाबा कदम, सत्यवान जावकर, प्रकाश देवदास, बा. सी. साळवी आदी उपस्थित होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस