मुंबई

क्षयरोग रुग्णालय होणार फायर प्रूफ, पालिका ६ कोटी रुपये खर्चणार

प्रतिनिधी

मुंबई : शिवडी येथील टीबी रुग्णालय सुरक्षित होणार आहे. रुग्णालयातील अग्नी सुरक्षा यंत्रणा जुनी झाल्याने नव्याने अद्यावत सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी ५ कोटी ९७ लाख ५७ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील विद्यमान अग्निशमन यंत्रणा जुनी झाली असून, बहुतांशी विभागांमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने आता या रुग्णालयातील यंत्रणा नव्याने बसवून हे रुग्णालय फायर प्रूफ बनवण्यात येणार आहे.

क्षयबाधित रुग्णांवर शिवडी येथील या विशेष रुग्णालयात उपचार केले जात असून, येथील रुग्णांच्या तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आग प्रतिबंधक यंत्रणा सक्षम आणि कार्यान्वित असणे आवश्यक आहे. या संदर्भात अतिरिक्त विभागीय अग्निशमन अधिकारी यांच्या स्थळ निरीक्षण आणि शिफारशीच्या अनुषंगाने या रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणा अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी मेसर्स अजंटा इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स एलएलपी ही कंपनी पात्र ठरली आहे.

-क्षयरोग रुग्णालय हे १२०० खाटांचे विशेष रूणालय आहे. आशियातील सर्वात मोठे असे विशेष क्षयरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज सुमारे १००-१५० बाह्यरुग्ण कक्षात उपचार घेत असतात.
-रुग्णालयात दररोज ५०-६० रुग्ण दाखल होत असतात. मुंबईत क्षयरोग रुग्णांची संख्या जागतिक सरासरीपेक्षा जास्त असून, मुंबईत दरवर्षी एमडीआर क्षयरोगबाधित सुमारे ४ हजार रुग्णांची नोंद होत असते.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त