मुंबई

'टनल हूड' तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर; बुलेट ट्रेन प्रकल्पामधील पर्वतीय बोगद्यांसाठी उपयुक्त

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग पर्वतीय भागातून जात आहे. या मार्गामध्ये राज्यातील सात आणि गुजरातमधील एक अशा एकूण आठ पर्वतीय बोगद्यांचा समावेश आहे. या सर्व बोगद्यांच्या दोन्ही टोकांवर टनल हूड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग पर्वतीय भागातून जात आहे. या मार्गामध्ये राज्यातील सात आणि गुजरातमधील एक अशा एकूण आठ पर्वतीय बोगद्यांचा समावेश आहे. या सर्व बोगद्यांच्या दोन्ही टोकांवर टनल हूड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती आली आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात येताच या मार्गावरून ताशी ३२० किलोमीटर वेगाने ट्रेन धावण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वेगाने धावणारी बुलेट ट्रेन जेव्हा बोगद्यात प्रवेश करते, तेव्हा ती मोठ्या प्रमाणात हवा पुढे ढकलते. यातून बोगद्यामध्ये दाब लहरी निर्माण होतात. या दाब लहरींचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास ट्रेन बोगद्यातून बाहेर पडताना मोठ्या स्फोटासारखा आवाज निर्माण होऊ शकतो. टनल हूड हे मोकळ्या वातावरण आणि बोगद्याच्या मर्यादित जागेदरम्यान संक्रमण क्षेत्र म्हणून काम करते. त्यामुळे हवेचा प्रवाह अधिक नियंत्रित होतो, दाबातील अचानक बदल कमी होतात आणि संपूर्ण प्रणालीची वायुगतिकीय कार्यक्षमता सुधारते.

हे तंत्रज्ञान बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात वापरण्यात येत आहे. यामुळे वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या सुरक्षित आणि कार्यक्षम संचालनास मदत होईल.

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

नाशिक-विदर्भ प्रवाशांसाठी खुशखबर! 'स्पेशल'चा टॅग हटला, नाशिक रोड-बडनेरा मेमू आता नियमित, १६ स्थानकांना थांबा

Video : अवघ्या ५ मिनिटांच्या उशिराची 'अशी' शिक्षा? डिलिव्हरी बॉयचा मोबाईल हिसकावून फ्लॅटमध्ये नेलं अन्...

CJP चे Instagram हँडल अचानक बंद, काही तासांत पुन्हा सुरू; अभिजीत दिपके म्हणाले - 'स्वातंत्र्यदिनी आमचा आवाज...

Navi Mumbai Airport : 'पिंगा'च्या तालावर थिरकल्या तिरंगी पताका; स्वातंत्र्यदिनाची भन्नाट सजावट सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO