PM
मुंबई

कुलाबा, मरीन लाइन्समध्ये गढूळ पाणी; मलबार जलाशयाची मेजर दुरुस्तीची गरज नाही- तज्ज्ञ समिती

Swapnil S

मुंबई : मलबार हिल येथील जलाशय ब्रिटीशकालीन असून आजही मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे जलाशयाची मेजर दुरुस्ती करण्याची गरज नाही, असे मत तंज्ज्ञ समिती सदस्या अल्पा सेठ यांनी व्यक्त केले. मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून, सोमवार, १८ डिसेंबर रोजी समितीने जलाशयाची पाहाणी केली. दरम्यान, समितीच्या पहाणी दौऱ्या आधी जलाशयाचा कप्पा क्रमांक १ रिकामा करण्यात आला होता. परंतु दोन तासांच्या पहाणीनंतर रिकामा कप्पा पुन्हा भरण्यात आल्याने शहरातील कुलाबा, मरीन लाइन्स, ग्रॅट रोड परिसरातील काही भागात मंगळवारी गढूळ पाणी येणार असल्याने या ठिकाणच्या नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मलबार हिल जलाशय १५० वर्षें जुने असून, आजही मजबूत स्थितीत आहे. मलबार हिल जलाशय जुनी वास्तू असून, ती वास्तू जपणे गरजेचे आहे. याआधीही जलाशयाची पाहाणी केली असून सोमवार १८ डिसेंबर रोजी तज्ज्ञ समितीने पहाणी केली. या पहाणीत मेजर दुरुस्तीची गरज आहे, असे निदर्शनास आले. याबाबत तज्ज्ञ समितीची बैठक होऊन अहवाल लवकरच पालिका प्रशासनाला सादर करण्यात येईल, असेही अल्पा सेठ यांनी सांगितले.

जलाशयाची पुनर्बांधणी करण्याचे विचाराधीन

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करण्याचे विचाराधीन आहे. यासाठी आय. आय. टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीने सोमवारी शेवटची पहाणी केली, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस