मुंबई

ललित हॉटेल उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक

पैशांची गरज असल्याने विक्रमने धमकीचा कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

प्रतिनिधी

अंधेरी परिसरातील ललित हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन आरोपींना सहार पोलिसांनी गुजरातच्या वलसाड येथून अटक केली. विक्रम सिंग आणि येशू सिंग अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही गुरुवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

पैशांची गरज असल्याने विक्रमने धमकीचा कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अंधेरीतील सहार परिसरात ललित नावाचे एक पंचतारांकित हॉटेल आहे. दोन दिवसांपूर्वी या हॉटेलच्या लॅण्डलाईनवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले होते. ते बॉम्ब निकामी करायचे असेल तर पाच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी या व्यक्तीने दिली होती. या घटनेनंतर हॉटेल प्रशासनाने ही माहिती पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस, बॉम्बशोधक व नाशक पथकाचे अधिकारी श्‍वान पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले होते. या पथकाने संपूर्ण हॉटेलची पाहणी केली; मात्र पोलिसांना कुठेच काहीच आक्षेपार्ह सापडले नाही. बॉम्ब असल्याची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बॉम्ब असल्याचा कॉल करून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.

आदेशानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान तो कॉल गुजरातच्या वलसाड येथून आला होता. त्यामुळे सहार पोलिसांचे एक विशेष पथक तिथे गेले होते. या पथकाने विक्रमला चौकशीसाठी ताब्यात घेतले. विक्रम हा बेरोजगार असून त्याचा येशू हा मित्र आहे. त्यानेच त्याला बोगस दस्तावेज सादर करुन एक सिमकार्ड मिळवून दिले होते. याच सिमकार्डवरुन त्याने ललित हॉटेलमध्ये कॉल करून चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देताना बॉम्ब निकामी करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे उघडकीस आले होते.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी