मुंबई

वाहनचोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना अटक

या दोघांविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्यांच्या अटकेने चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई : वाहनचोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या दहिसर युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. विवेक सुरेश केवट ऊर्फ बुढ्ढा आणि अजय अमरेश दुबे ऊर्फ पंडित अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी कस्तुरबा मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्यांच्या अटकेने चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही दिवसांत बोरिवली परिसरात वाहनचोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले होते. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपींचा शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरून विवेक केवट आणि अजय दुबे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील दोन ऍक्टिव्हा बाईक, दोन मोबाईल आणि कॅश असा ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले! २९ महापालिकांचा महासंग्राम १५ जानेवारीला, १६ जानेवारीला मतमोजणी; आचारसंहिता लागू

पुण्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार सेंट्रल पार्क; आचारसंहिता लागू होण्याआधीच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून घोषणांचा पाऊस

म्हाडा वसाहतींच्या सामूहिक पुनर्विकासाला गती; २० एकरवरील प्रकल्पांसाठी नवीन धोरण जाहीर

केंद्राच्या ‘मनरेगा’तून महात्मा गांधी बाहेर; आता योजनेचे नवे नाव ‘विकसित भारत-जी- राम-जी २०२५’