मुंबई

घातक शस्त्रांच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

प्रतिनिधी

मुंबई : घातक शस्त्रांच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. कांदिवली परिसरात काही तरुण घातक शस्त्रांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी पोईसर जिमखाना रोड, राजीव गांधी उद्यानाजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. तिथे आलेल्या निलेश आणि अमूल या दोन तरुणांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे सापडले. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोघांना मंगळवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस