मुंबई

एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

अंगझडतीत पोलिसांना प्रत्येकी सत्तर आणि ऐंशी ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले.

नवशक्ती Web Desk

मुंबई : घाटकोपर येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना वरळी युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी सुमारे ३० लाख रुपयांचे दिडशे ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. अटकेनंतर दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ काही तरुण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे गस्त सुरू केली होती.

यावेळी पोलिसांनी संशयित फिरणाऱ्या दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना प्रत्येकी सत्तर आणि ऐंशी ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे तीस लाख रुपये इतकी आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना कोर्टाने गुरुवार १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

"ज्यांना स्वतःच्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते..."; मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Mumbai : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याने शिवाजी पार्क परिसरात तणाव; ठाकरे गट संतप्त, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

Mumbai : २० सप्टेंबरपासून मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद; MMRDA चा निर्णय

जपानमधून ‘टायफून’ क्षेपणास्त्र हटवा! चीनची अमेरिकेकडे मागणी

राज्यातील सर्व न्यायालये कार्यरत आहेत का? खासदार, आमदारांविरोधातील खटल्यांबाबत हायकोर्टाने सरकारला फटकारले