मुंबई

गोरेगाव-विक्रोळीतील अपघातात दोन बाईकस्वारांचा मृत्यू

ठाण्याहून घाटकोपरच्या दिशेने जाताना विक्रोळीतील पूर्व दुतग्रती मार्गावरील टाटा पॉवर कार्यालयाजवळ त्याच्या बाईकला अपघात झाला

Swapnil S

मुंबई : गोरेगाव आणि विक्रोळीतील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन बाईकस्वारांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नवनाथ विठ्ठल गावडे (५०) आणि सुरेश गुप्ता (४७) यांचा समावेश आहे. याप्रकरणी आरे आणि विक्रोळी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. नवनाथ ठाण्याच्या शिवाजीनगर परिसरात राहत असून, घाटकोपरच्या एका खासगी कंपनीत कामाला होता. मंगळवारी तो त्याच्या बाईकवरून कामावर जात होता.

ठाण्याहून घाटकोपरच्या दिशेने जाताना विक्रोळीतील पूर्व दुतग्रती मार्गावरील टाटा पॉवर कार्यालयाजवळ त्याच्या बाईकला अपघात झाला होता. त्याला विक्रोळी पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात नवनाथची बाईक स्लीप होऊन डिवायडरला धडकली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. दुसरा अपघात सोमवारी दुपारी एक वाजता अंधेरीतील जेव्हीएलआर रोड, अदानी इलेक्ट्रीकसिटी बसस्टॉपजवळील पेट्रोलपंपासमोर झाला. सुरेश गुप्ता हा मालाडच्या मार्वे रोड, राठोड व्हिलेजमध्ये त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत असून, त्याचे किराणा मालाचे एक दुकान आहे. सोमवारी त्याच्या बाईकवरून मालाडच्या दिशेने येत होते. भरवेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या बाईकला धडक दिली होती.

या अपघातात सुरेशसह त्याची मुलगी दिपाली ही जखमी झाली होती. जखमी झालेल्या दोघांनाही अंधेरीतील कामगार व नंतर कूपर रुग्णालयात दाखल केले. तिथे सुरेशला सायंकाळी सव्वाचार वाजता उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले, तर दिपालीला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी त्याची पत्नी बिंदो गुप्ता यांच्या तक्रारीवरुन आरे पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा; शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलला

‘ऑक्टोबर हिट’ने मुंबईकर घामाघूम! तापमान ३२; पण भास ४१चा... सोशल मीडियावर भावनांचा भडका

कांदळवनांची जमीन वन विभागाच्या ताब्यात द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा सरकारला सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा; दिवाळीनंतर पुन्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार

छत्तीसगडमध्ये २१० नक्षलवाद्यांची शरणागती; संविधान हातात घेत पोलिसांसमोर शस्त्रे ठेवली