मुंबई

धक्का लागला म्हणून दोन चुलत बंधूंवर प्राणघातक हल्ला

चारजणांच्या एका टोळीने कैचीसह स्क्रु ड्राव्हरने प्राणघातक हल्ला केला.

Swapnil S

मुंबई : चालताना धक्का लागला म्हणून दोन चुलत बंधूंवर चारजणांच्या एका टोळीने कैचीसह स्क्रु ड्राव्हरने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात साहिल मुहाजअली खान आणि फारुख हाफिज खान हे दोघेही जखमी झाले असून, त्यांना भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी लट्टन, समीर, सोहेलसह अन्य एका तरुणाविरुद्ध मारामारीसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

साहिल हा मूळचा उत्तरप्रदेशच्या अलीगढचा रहिवाशी आहे. शनिवारी १६ डिसेंबरला तो उत्तरप्रदेशातून मुंबईत आला होता. रात्री साडेनऊ वाजता तो वांद्रे येथील बेहरामनगरातील एका हॉटेलमधून जेवण करुन घरी जात होता. यावेळी तिथे दारुच्या नशेत लट्टनसह इतर तरुण आपसांत भांडण करत होते. चालताना त्याचा लट्टनला धक्का लागला होता. त्यामुळे त्याच्यासह इतर तिघांनी त्याच्यावर कैचीसह स्क्रु ड्रायव्हरने प्राणघातक हल्ला होता. यावेळी त्याचा चुलत भाऊ फारुख तिथे आले आणि त्याने त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी या चौघांनी त्यालाही बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. हल्ल्यात बेशुद्ध झालेल्या साहिलसह फारुखला नंतर वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. फारुखला प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले, तर साहिलवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. ही माहिती मिळताच निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याच्या जबानीनंतर चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी