मुंबई

३० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोन संचालकांना अटक

Swapnil S

मुंबई : सुमारे ३० लाखांच्या फसवणुप्रकरणी खासगी कंपनीच्या दोन संचालकांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. अशोक शशिकांत धनुका आणि सुनिता काशिकांत धनुका अशी या दोघांची नावे ते दोघेही सुनिता ऍग्री एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यांत अन्य एका संचालकाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. राजसिंग जयप्रकाशसिंग राजपूत हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून, त्यांच्या मालकीची एक खासगी कंपनी आहे. ही कंपनीत विदेशात विविध माल पाठविण्याचे काम करते. गेल्या वर्षी त्यांची कांदिवलीतील सुनिता ऍग्री एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अशोक, अंकिता आणि सुनिता धनुका यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यांच्या कंपनीने त्यांना इजिप्त देशात बासमती राईस निर्यात करण्याची मोठी ऑर्डर दिली होती. याबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये कायदेशीर करार झाला होता. या करारानंतर त्यांच्या कंपनीने भारतातून इजिप्तला गोल्डन राईस निर्यात केले होते. अशाच प्रकारे काही दिवसांत कुवेतला बासमती राईस पाठविण्यात आले होते.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त