मुंबई

चाळीवर दुमजली इमारत कोसळून दुर्घटना,सहा जण जखमी

प्रतिनिधी

भिवंडीत एका चाळीवर दुमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात (आयजीएम) दाखल करण्यात आले. जखमींपैकी एक गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. मोबीन मास्टर असे या दुर्घटनाग्रस्त इमारतीचे नाव आहे.

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद जहांगीर असे आहे. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. ज्या चाळीवर ही इमारत कोसळली, त्या चाळीतील खोलीत भिवंडीत हातमागावर काम करणारे मजूर होते.

भिवंडी-निजामपूर महानगर-पालिकेने मोबीन मास्टर ही इमारत धोकादायक असल्याचे सन २०१७ मध्येच जाहीर केलेले होते. मंगळवारी सकाळी अचानक मोठा आवाज झाल्यानंतर आसपासचे रहिवासी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी येथे इमारत कोसळल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडलेल्या लोकांची सुटका केली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया