मुंबई

'सीआरझेड’ची परवानगी नसल्याने मढ येथील दोन स्टुडिओ जमीनदोस्त

सीआरझेड’च्या परवानगीची कागदपत्रे सादर करण्यासाठी १० दिवसांचा वेळ देण्यात आला होता

प्रतिनिधी

मालाड मढ येथील स्टुडिओ गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘सीआरझेड’ची परवानगी न घेताच येथे स्टुडिओंची उभारणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर येथील दोन स्टुडिओ मंगळवारी पालिकेने जमीनदोस्त केले. या दोन्ही स्टुडिओमालकांना ‘सीआरझेड’च्या परवानगीची कागदपत्रे सादर करण्यासाठी १० दिवसांचा वेळ देण्यात आला होता; मात्र त्यांनी ही कागदपत्रे सादर न केल्याने ‘मिलेनियर्स’ व ‘एक्स्प्रेशन’ स्टुडिओ पालिकेने जमीनदोस्त केले आहेत. दरम्यान, ५० हजार फूट जागेवर उभारण्यात आलेल्या ‘बालाजी स्टुडिओ’च्या मालकांनी न्यायालयात धाव घेतल्याने ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, अशी माहिती ‘पी-उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

मालाड येथील मढ, मार्वे, एरंगळ, भाटी या भागात २०२१ आणि २०२२ या कालावधीत ‘एनडीझेड’ आणि ‘सीआरझेड’चे उल्लंघन करत ४९ अनधिकृत स्टुडिओ तयार करण्यात आले आहेत,अशा तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेच्या पी-उत्तर विभागाने मंगळवारी कारवाई करत ‘मिलेनिअर्स’ आणि ‘एक्स्प्रेशन्स’ स्टुडिओवर कारवाई केली. या स्टुडिओंना तात्पुरते शेड आणि सेट बनवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती; मात्र या परवानगीच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र सागरीकिनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) आणि पर्यावरण विभागाकडून मिळालेली परवानगी महापालिकेला सादर करा, असे आदेश पालिकेच्या पी-उत्तर विभागाने दिले होते; मात्र नूतनीकरणासाठी आवश्यक असलेली परवानगी सादर न केल्यामुळे महापालिकेच्या पी-उत्तर विभागाने कारवाई केली.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश