Mumbai : उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक

शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक वांद्रे येथील 'मातोश्री'वर बोलावली आहे.

Swapnil S

मुंबईः शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक वांद्रे येथील 'मातोश्री'वर बोलावली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमधील खासदारांच्या बंडखोरीच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या पक्षातही खळबळ उडाली आहे. शिवसेना (उबाठा) चे काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या सततच्या चर्चाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या २०२२ मधील बंडामुळे मूळ शिवसेनेत फूट पडली होती आणि राज्यात सत्ताबदल झाला होता.

या बैठकीकडे शिवसेना संसदीय पक्षाची एकजूट राखण्यासाठी ठाकरे यांनी केलेला एक महत्त्वपूर्ण प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्यावर सर्वांचे लक्ष असेल, कारण अलीकडच्या पक्षाच्या बैठकींमधील त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या राजकीय भविष्याबाबत तर्क-वितकांना उधाण आले आहे. संजय उर्फ बंडू जाधव हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.

दरम्यान, पक्षाचे नेते संजय राऊत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आगामी पावसाळी अधिवेशन, मतदारसंघातील निधीचे प्रश्न आणि स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती राऊत यांनी दिली.

Monsoon Update : राज्यावर चिंतेचे ढग; मान्सून हर्णेपुढे सरकेना

अमेरिकेचा उद्दामपणा कायम; होर्मुझमध्ये नाकेबंदी स्वीकारावीच लागेल - मार्को रुबियो

क्षेपणास्त्र पाडण्याच्या यंत्रणेची यशस्वी चाचणी

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख

महिला अधिकाऱ्यांची पहिली तुकडी लष्करात; 'आयएमए'च्या दीक्षांत संचलनाचे राष्ट्रपती यांच्याकडून निरीक्षण