मुंबई

राज ठाकरेंच्या टीकेवर उद्धव ठाकरे म्हणाले, "जशी स्क्रिप्ट आली तशी..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यादिवशी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केले होते

प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यादिवशी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केले. यानंतर आज उद्धव ठाकरे हे त्यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना म्हणाले की, "जशी स्क्रिप्ट आली, तशी त्यांनी वाचली" असा टोला लगावला. दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपणावर मी माझी भूमिका मांडले असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेल्या १८ वर्षांपासून तेच ते घासलेले, पुसले भाषण होते. मी माझी भूमिका मांडलेली आहे. इतकी वर्ष कारवाई होत नव्हती आणि आता कारवाई होते. जशी स्क्रिप्ट आली तशी त्यांनी ती वाचून दाखवली. राज्यात इतरही अनेक अनधिकृत गोष्टी आहेत, त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी पत्र द्यावे" असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवरही स्पष्टीकरण दिले. ते या भेटीबद्दल म्हणाले की, "याआधी खुलेपणा होता. पण हल्ली असे दिसत आहे की, बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरतात. भविष्यात कधी अशी बंद दाराआड चर्चेचा विषय आला तर तेव्हाच तेव्हा बघू. ही भेट फक्त हाय आणि हॅलो वाली होती. " असेही ते म्हणाले.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती