घरी बोलावून मंत्री केले, ही माझी चूक! उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर ‘प्रहार’ 
मुंबई

घरी बोलावून मंत्री केले, ही माझी चूक! उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर ‘प्रहार’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषदेची आमदारकी मिळवलेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जोरदार टीका केली.

Swapnil S

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषदेची आमदारकी मिळवलेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जोरदार टीका केली. ‘त्यांना घरी बोलावून मंत्री केले, ही माझी चूक झाली. लोभापायी गेलेत ते जाऊ द्या’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी कडूंवर ‘प्रहार’ केला.

प्रहार पक्षाचे प्रमुख असलेल्या बच्चू कडू यांनी नुकताच त्यांचा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन केला. कडू यांच्या या निर्णयावर नाराज झालेल्या सोलापूर, परभणी आणि धाराशिवमधील ‘प्रहार’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री' वर हा प्रवेश पार पडला.

त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री केला, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या. लढणारे कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा मला आनंद आहे.

तर, बच्चू कडू यांनी आपल्याला विकून टाकले आणि मिंधे सेनेत प्रवेश केला. आपण स्वाभिमानी असल्यामुळे ठाकरेंच्या सोबत आलो आहोत. यापुढे नेहमी ठाकरेंच्या सोबत राहू, अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी यावेळी दिली. या पक्षप्रवेशावेळी आमदार अंबादास दानवे, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर उपस्थित होते.

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना बच्चू कडू हे ‘प्रहार’ पक्षाचे एकमेव आमदार होते. त्यावेळी ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बच्चू कडू हे त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले. काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी त्यांचा ‘प्रहार’ पक्ष शिवसेनेत विलीन केला आणि विधान परिषदेवर आमदारकी मिळवली. शिंदे यांनी कडू यांच्यावर विदर्भाची जबाबदारी सोपवली आहे.

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आतापर्यंत १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड