मुंबई

हा केवळ राजकीय प्रश्न नसून राज्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न - उद्धव ठाकरे

17 तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले

प्रतिनिधी

राज्यपाल आणि राज्यकर्त्यांकडून सातत्याने महाराष्ट्राचा अवमान केला जात आहे, शिवरायांबद्दल सातत्याने बेताल विधाने केली जात आहेत, सीमावर्ती गावांवर कर्नाटक दावा करत आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला बाधा येत आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. या पार्श्वभूमीवर 17 तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

उद्धव ठाकरे म्हणाले, "राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता कलंकित होत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जात आहे. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही सीमेवरच्या गावांवर दावा केला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या विधानामुळे महाराष्ट्राची अस्मिता कलंकित होत आहे. उद्योग गुजरातला पळून गेले. कर्नाटकात पुढच्या वर्षी निवडणुका असल्याने राज्यातील उद्योग आता कर्नाटकात जाणार का?

17 रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार

महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत असल्याने आता महाराष्ट्राच्या ताकदीचे भव्य दर्शन घडवले पाहिजे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा निषेध मोर्चा काढण्यात येणार असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. हा केवळ राजकीय प्रश्न नसून राज्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी